पुणेरी अमृततुल्य .....

एका कपात ...आनंद अफाट...!!!

नमस्कार मंडळी...

सतत नवीन प्रयोग करत राहणे ही आमची परंपराच. या परंपरेतूनच आम्ही पुणेरी अमृततुल्य ची स्थापना केली. उद्देश एकच होता दगदगीच्या या जिवनात आपल्या लोकांना उत्कृष्ठ चवीचा चहा मिळाला पाहिजे. म्हणूनच आम्ही आपला थकवा घालवण्यासाठी "पुणेरी अमृततुल्य" च्या रूपाने चहाच्या व्यवसायात पदार्पण केले. चहाची गुणवत्ता आणि आमचा सेवाभाव यामुळे अल्पावधीतच "पुणेरी अमृततुल्य" लोकप्रिय झाला. सामाजिक जबाबदारीच्या भानातूनच आम्ही मराठी उद्योजक निर्माण करण्याचे ठरवले आणि पहिली फ्रॅंचायजी दिली.त्या शाखेचा व्यवसाय बघून आमच्याकडे अनेक तरुण विविध ठिकाणांहून फ्रॅंचायजी साठी चौकशी करू लागले.चहाची गुणवत्ता आणि व्यवसायातील संधी यामुळे अल्पावधीतच " पुणेरी अमृततुल्य" महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले .मराठी माणसाने नोकरीच्या मागे न पळता स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी "पुणेरी अमृततुल्य" ने मोठी संधी निर्माण केली आहे.त्याचा लाभ विविध वर्गातील लोक घेत आहेत याचाच आनंद आहे.मराठी माणसाला उद्योजक बनवणे हेच ध्येय घेऊन "पुणेरी अमृततुल्य" चा प्रवास तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने सुरू आहे.अशीच आपुलकी आणि स्नेह कायम असावा एवढीच प्रार्थना...!!!